उस्मानाबाद, ३ ऑगस्ट २०२० :उस्मानाबाद जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकला आज दिनांक २ ऑगस्ट रोजी रात्र गस्त करतेवेळी जप्त केलेला आहे.
बीड जिल्ह्यातील येळंब गावातील रहिवासी ट्रक चालक उमेश आभिमान भालेकर, आणि त्याचा सहाय्यक पंडित हरिभाऊ जाधव हे दोघे आज दिनांक २ ऑगस्ट रोजी,ट्रक क्रमांक एम. एच. १२ एन. एक्स. ७६०९ या मधून ७ ब्रास वाळू विना परवाना वाहून नेत होते. यावेळी, वाशी पोलीस ठाणेच्या हद्दीत स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री पांडुरंग माने यांच्यासह पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक रात्र गस्त करत असतांना त्यांना हा संबंधित ट्रक आढळला. विनापरवाना वाळू वाहून नेत असल्याकारणाने पथकाने संबंधित ट्रक जप्त केला, तसेच वाशी पोलीस ठाणेच्या ताब्यात दिला.
या संबंधित पुढील कारवाई, महसूल प्रशासनाशी संपर्क साधून करण्यात येणार आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.











































