विनापरवाना वाळू वाहून नेणारा ट्रक जप्त.

उस्मानाबाद, २९ जुलै २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहून नेणारा ट्रक पोलीसांनी दिनांक २९ जुलैला रात्री गस्त करतेवेळी जप्त केलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्था. गु. शा. चे पो उपनि- पांडुरंग माने यांच्यासोबत पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक दिनांक २९ जुलै ला रात्र गस्त करत असताना ट्रक क्रमांक के. ए. ५६- ३०४१ परवानगी शिवाय वाळू वाहून नेत असताना आढळले. ट्रक चालक मेहबुब मेहताब नदाफ व त्याचा साहाय्यक सय्यद जावेद शेख हे दोघे उमरगा तालुक्यातील मुरूमचे रहिवासी.

विनापरवाना वाळू वाहतूक करण्यासाठी पथकाने संबंधित ट्रक जप्त करून उमरगा पोलीस ठाणेच्या ताब्यात दिला आहे. महसूल प्रशासनाशी संपर्क साधून उर्वरित कारवाई केली जाणार आहे.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा