बारामती, ३ ऑक्टोंबर २०२०: शहरातील राष्ट्रीयकृत बँकेच्या समोर येणाऱ्या खातेदारांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणारे पगार व पेन्शन साठी वयस्कर लोक येथे बँकेच्या गलथान कारभारामुळे उन्हात तासनतास थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तर बँकेतील परप्रांतीय कर्मचाऱ्यांचे बोलणे समजत नसल्याचे काही वृद्धांची तक्रार आहे.
बारामती शहरातील भिगवण चौकात तसेच भिगवण रोड वर मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकृत बँका आहेत.सध्या कोरोना संसर्गामुळे येथील बँकेत जाण्यासाठीचे मुख्य दरवाजे बंद करून दुसऱ्या दरवाजाने खातेदारांना रांगेत उभे करून आत मध्ये सोडले जातं आहे.त्यामुळे येथे मोठी गर्दी होत असुन कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स,मास्क,सॅनिटायजर वापरात नासल्याचे आमच्या लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत लक्षात आले बँकेत एका व्यक्तीला सोडले जाते आहे.आत मध्ये बँकेत गर्दी नसताना देखील बाहेर विनाकारण गर्दी केली जात असल्याचे रांगेतील खातेदाराने सांगितले यामध्ये महिला व सेवानिवृत्ती पेन्शन घेण्यास आलेल्या महिला व पुरूषांची संख्या अधिक आहे.
भिगवण चौकातील बँकेत देखील हेच चित्र पाहायला मिळाले येथे असणाऱ्या वयस्कर लोकांच्या रंगेमुळे शहरात आटोक्यात आलेला कोरोना संसर्ग वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेत ही अवस्था आहे.बँकेतील परप्रांतीय कर्मचाऱ्यांची हिंदी भाषा समजण्यासाठी व बोलण्यासाठी अडचण येत असल्याचे काही वयस्कर नागरिकांनी सांगितले तर येथे नेहमीच तासनतास उभे राहावे लागत असल्याची तक्रार देखील केली तर वृद्धांना व्यवस्थित माहिती देत नसल्याचे देखील काहींनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव