पुणे ६ फेब्रुवारी २०२५: ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून अनेक महिला वंचित राहण्याची शक्यता आहे. कारण, या योजनेत काही महिला नियमांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, आता या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, याबाबत महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “ज्या महिलांकडे चारचाकी गाड्या आहेत, त्यांना महिन्याला १०,००० रुपयांचे पेट्रोल लागते, त्यांना हे दीड हजार रुपये देऊन काय उपयोग? ही योजना घरकाम, शेतीकाम करणाऱ्या गरीब महिलांसाठी आहे.” त्यामुळे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे