“विराट” ची शतकासह विक्रमांशी बरोबरी

कोलकाता:  ईडन गार्डनवर सुरू असलेल्या ऐतिहासिक डे-नाईट कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली. बांगलादेशच्या गोलंदाजांना धुरळा चारत त्याने कसोटी क्रिकेटमधील आपले २७ वे शतक साजरे केले.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेली अर्धशतकी खेळी आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीवर भारताने बांगलादेशपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. कोहलीने केलेल्या या शतकी खेळीबरोबर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २७ शतके सचिनने झळकावली आहेत. या विक्रमाशी विराटने आज बरोबरी केली. सचिन आणि विराटने १४१ डावांमध्ये २७ शतके झळकावली आहेत.

कर्णधार म्हणून विराट कोहलीचे ४१ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले आहे. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरीदेखील केली आहे. विराटने आतापर्यंत १८८ डावांमध्ये ४२ शतके झळकाविली आहेत. मात्र, हा पल्ला गाठायला पाँटिंगला ३७६ डाव खेळावे लागले होते. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन अव्वलस्थानी कायम आहेत. त्यांनी ७० डावांमध्ये २७ शतके झळकावली आहेत.
तर तिसऱ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने ३६८ डावांत ३३ शतके झळकाविली आहेत.

ऐतिहासिक ठरलेल्या या कसोटीत कोहलीने १६१ चेंडूंत १०२ धावा करत दिवस-रात्र कसोटीत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
कोहली हा दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा पाचवा कर्णधार ठरला आहे. कर्णधार म्हणून विराटचे हे २० वे शतक आहे. यातही विराटने रिकी पाँटिंगला मागे टाकल्याचे दिसून येते.

दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारे कर्णधार :

फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) – २०१६

स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) – २०१६

जो रूट (इंग्लंड) – २०१७

केन विल्यमसन (न्यूझिलंड) – २०१८

विराट कोहली (भारत) – २०१९

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा