कसोटी क्रिकेटला विराट कोहलीचा अलविदा; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती..

23
Virat Kohli Retirement Test Cricket
कसोटी क्रिकेटला विराट कोहलीचा अलविदा

Virat Kohli Retirement Test Cricket: भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा दिला आहे. रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत याबबात माहिती दिली. त्यात त्यान म्हंटल की, 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला मी अखेर रामराम करीत आहे. कोहलीने आता पर्यंत 123 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 30 शतक व 31 अर्धशतक झळकावले आहेत. याशिवाय 14 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तब्बल 9230 धावा केल्या आहेत. भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाला त्याच्याच घरी हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचला होता.

काय म्हणाला विराट ?

विराट म्हणाला, “14 वर्षांपूर्वी मी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा ब्ल्यु रंगाचा पोशाख घातला होता. घातला होता खर सांगायच झाल तर, या फॉरमॅट मध्ये मला असा प्रवास करायला लागेल याची मी कधीच कल्पना देखील केली नव्हती. कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि मला धडे शिकवले.”

पुढे तो म्हणाला की, “मी या फॉरमॅट मधून निवृत्ती घेणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण, ही योग्य वेळ आहे. माझ्याकडे जे काही होते ते सर्व मी दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे. मी कृतज्ञतेने आज निवृत्ती घेत आहे. या खेळासाठी,मी ज्या लोकांसोबत मैदान शेअर केले त्याच्यासाठी आणि वाटेत मला ज्या व्यक्तिनि मदत केली त्या प्रत्येक व्यक्तिसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मी माझ्या कसोटीची कारकिर्दीकडे नेहमी हसऱ्या चेहऱ्याने पाहतो.” असे कोहली म्हणाला.

कसोटी क्रिकेटमध्ये वेकटीक गुणांची कसोटी लागते. या फॉरमॅटमध्ये नेहमी स्वत:ला शांत ठेवून कसे खेळायचे हे शिकलो, पाच दिवसांच्या खेळात प्रत्येक दिवस आपली परीक्षा घेतो, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही, पण ते कायम तुमच्यासोबत राहतात,असे विराटने पोस्टमध्ये लिहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर