५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विराट कोहलीने केले दोन मोठे विक्रम

त्रिनिदाद, वेस्ट-इंडिज २१ जुलै २०२३ : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात, ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात जगातील कोणत्याही खेळाडूने अर्धशतक झळकावले नव्हते. ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० किंवा ५० पेक्षा अधिक धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज ठरलाय. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० सामने खेळणारा किंवा ५०० हून अधिक सामने खेळणारा तो जगातील १० वा खेळाडू ठरला. यासह WI vs IND दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये, पहिल्या दिवशी ८७ धावांच्या नाबाद खेळीसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ५ वा खेळाडू बनला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला मागे टाकले. विराट कोहलीच्या सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,५४८ * धावा आहेत. तो आता जॅक कॅलिसच्या २५,५३४ धावांच्या पुढे गेला आहे.

विशेष म्हणजे विराट कोहलीने आपल्या ५०० व्या सामन्यात एवढा मोठा आकडा बनवला आहे, तर जॅक कॅलिसने ५१९ सामन्यात २५,५३४ धावा केल्या आहेत. म्हणजेच विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी चांगली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांची नावे आणि त्यांची आकडेवारी जाणून घेऊया-

१). सचिन तेंडुलकर: ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने ३४३५७ धावा
२). कुमार संगकारा : ५९४ सामन्यात ५६.७७ च्या सरासरीने २८०१६ धावा
३). रिकी पाँटिंग : ५६९ सामन्यांमध्ये ४५.९५ च्या सरासरीने २७४८३ धावा
४). महेला जयवर्धने: ६५२ सामन्यांत ३९.१५ च्या सरासरीने २५९५७ धावा
५). विराट कोहली ५०० व्या सामन्यात ५३.६७ च्या सरासरीने २५५४८* धावा

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा