पुणे, 8 जून 2022: खराब कामगिरी आणि सातत्यपूर्ण क्रिकेटमुळे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली विश्रांती घेत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील टी-20 मालिकेत तो खेळणार नाही. क्रिकेटच्या मैदानातून छोटा ब्रेक घेऊनही चाहत्यांमध्ये कोहलीची क्रेझ कमी झालेली नाही.
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विराट कोहलीचे फॉलोअर्स झपाट्याने वाढत आहेत. कोहलीने या बाबतीत नवा विक्रम केला आहे. 200 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
रोनाल्डो पहिल्या तर मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर
जगभरातील सर्व क्रीडा दिग्गजांच्या फॉलोअर्सची यादी पाहिली तर कोहली यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर जगभरात सर्वाधिक फॉलो केले जाणारे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यानंतर अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. रोनाल्डोचे 451 मिलियन (45.1 करोड) आणि मेस्सीचे 334 मिलियन (33.4 करोड) चाहते आहेत.
सर्वाधिक फॉलो केलेले क्रीडा दिग्गज
ख्रिस्तियानो रोनाल्डो – 451 मिलियन
लिओनेल मेस्सी – 334 मिलियन
विराट कोहली – 200 मिलियन
नेमन जूनियर – 175 मिलियन
लेब्रॉन जेम्स – 123 मिलियन
आफ्रिका मालिकेतून कोहलीला विश्रांती
विराट कोहली नुकताच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना दिसला. कोहलीने या IPL 2022 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी एकूण 16 सामने खेळले, 22.73 च्या खराब सरासरीने फक्त 341 धावा केल्या. यादरम्यान त्याने केवळ दोन अर्धशतके ठोकली आणि तीनदा गोल्डन डकवर बाद झाला. टीम इंडियाला 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरी 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. यामुळे कोहलीला विश्रांती मिळाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे