कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस सातत्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढू लागले आहे. मात्र या गंभीर समस्येतही काही गमतीदार प्रसंग समोर येऊ लागले आहेत. लॉंग डाऊन घोषित झाल्यानंतर सर्व जनता घरात कोंडली गेली आहे. एरवी रविवार कधी येतो असे वाट बघणारे आज या कोरोनाच्या सुट्ट्यांना अक्षरशा वैतागले आहेत.
एरवी कामानिमित्त दिवसभर घराबाहेर पडणारे दांपत्य एकमेकांना वेळ देऊ शकत नाही म्हणून भांडत असतील, परंतु या कोरोनाने सगळ्याच गोष्टी बदलून टाकल्या आहे. गेली एक ते दीड महिना सर्व दाम्पत्य घरातच आहे आणि कंटाळून एकमेकांवर राग काढत आहेत. अशी बरेचशी प्रकरणे समोर आली आहेत. सध्या याला अनुसरून एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. लॉक डाउन मध्ये दिवसा गणित नवरा-बायकोमध्ये कसे वाद होतात हे व्हिडिओ बनवणाऱ्या ने गमतीशीर रित्या दाखवले आहे.