पेरा संघटनेतर्फे बुधवारपासून व्हर्च्युअल एज्युकेशन फेअर

लोणी काळभोर, दि. ०८ सप्टेंबर २०२०: नुकतेच विविध बोर्डांचे इयत्ता १२ वी चे निकाल जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांद्वारे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी लगभग सुरू झाली असून करिअर संदर्भातील मार्गदर्शनासाठी ‘पेरा’ प्रिमीन्यंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन या खासगी विद्यापीठांच्या संघटनेकडून व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरचे आयोजन ०९ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता करण्यात आले आहे.

या फेअरचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिली. प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या काळात राज्यातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासंदर्भातील एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान नवीन शिक्षण धोरण आणि त्याचे परिणाम, उच्च शिक्षणातील संशोधन, उच्च शिक्षणातून व्यावसायिक संधी, बायो इंजिनअरिंग, फुड टेक्नॉलॉजी आणि फार्मसी करिअर आदी विषयांवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करता येणार आहे. या एज्युकेशन फेअरच्या माध्यमातून घरी बसल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पेरा संघटनेअंतर्गत येणाऱ्या विद्यापीठांचे कॅम्पस, कोर्सेस आणि इतर सुविधा याची माहिती मिळणार आहे.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोर्फेशनल युनिव्हर्सिटी पुणे, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिवर्सिटी, पुणे, संदीप विद्यापीठ, नाशिक, संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर, एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद, एमआयटी डब्ल्युपीयु युनिवव्हर्सिटी, पुणे, डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे अँबी, विजयभूमी युनिवर्सिटी, ग्रेटर मुंबई ही विद्यापीठ पेरा संघटनेचे सदस्य आहेत.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते होणाऱ्या व्हर्च्युअल एज्युकेशन फेअरच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/PERA9SEPT या लिंकवर संपर्क करावा, असे आवाहन प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी बोलताना केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा