विशाखापट्टणम: मृतांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची भरपाई

विशाखापट्टणम, दि. ७ मे २०२०: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम मधील फार्मा कंपनीत गॅस गळती झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. स्थानिक प्रशासन आणि नौदलाने कारखान्याजवळील गावे रिकामी केली आहेत. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३०० हून अधिक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.

आर आर वेंकटापुरम मध्ये विशाखा एलजी पॉलिमर कंपनीकडून पहाटे अडीच वाजता धोकादायक विषारी वायूची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. या विषारी वायूमुळे कारखान्या पासूनचे तीन किलोमीटर पर्यंत भाग बाधित आहे. या क्षणी पाच गावे रिकामी करण्यात आली. सीएम जगन मोहन रेड्डी स्वत: विशाखापट्टणम मध्ये पोहोचले आहेत.

मृतांना एक कोटी रुपयांची भरपाई                                                                                                सीएम जगन मोहन रेड्डी यांनी किंग जॉर्जच्या रुग्णालयात दाखल झालेल्या पीडितांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी नुकसानभरपाई जाहीर केली. अपघातामुळे आपला जीव गमावल्यास नागरिकांच्या नातलगांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. यासह पीडितांना प्रत्येकी १० लाख रुपये व ज्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यांना एक लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच, ५ सदस्यांची समिती संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल.

१० वाजेपर्यंत गळतीवर नियंत्रण                                                                                                        अनेक तास मेहनत घेतल्यानंतर गळतीवर मात केली गेली आहे. यासह कारखान्याच्या आसपासच्या भागातून ३ हजार लोकांना वाचविण्यात आले आहे. ३०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात मुख्यतः मुले व वृद्ध आहेत. त्याचबरोबर संपूर्ण घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा