अनेकांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या विष्णु जाधव पोलिसांच्या ताब्यात, शिवाजीपार्क पोलिसांची कारवाई

7

मुंबई, ११ जून २०२३ : मुंबईत दादर परिसरात काही एजंटांना हाताशी धरून अनेकांना करोडोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या विष्णु महिपत जाधवला याला अखेर शिवाजीपार्क पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीपार्क पोलीस स्टेशन समोर असलेल्या नवलकर इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधव याने अनेक लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. विष्णु जाधवने लोकांना इमारतीच्या पुनर्विकासाचे स्वप्न दाखवून २०१८ साली १४ लोकांना २ कोटी ३४ लक्ष ६८ हजार रुपयांना गंडा घातला. त्या संदर्भात गुन्हा देखील शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात नोंद आहे.

या प्रकरणात जामीनावर बाहेर येताच विष्णु जाधवने लोकांना गंडा घालण्याचा धंदा पुन्हा जोमाने सुरु केला. माहिम पोलीस स्टेशन परिसरात सुद्धा चेक न वठवल्या प्रकरणी विष्णु जाधव विरुद्ध कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. विष्णु जाधव बऱ्याच दिवसांपासून पोलिसांच्या हातवर तुरी देऊन फरार होता. अखेर विष्णु जाधव याला मोठ्या शिताफीने शिवाजीपार्क पोलिसांनी पकडून आणले.

दादर परिसरातील महिलेला ३७ लाखांना फसवल्याप्रकरणी ९ जुन २०२३ रोजी विष्णु जाधव विरोधात ४२०,४०६,४०९ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल आहे. दादर परिसरात अनेकांची या प्रकरणी फसवणुक झाली असुन अनेक जण पोलिसात धाव घेत आहेत. त्यामुळे विष्णु जाधव आणि भुरट्या एजंट पासुन सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा