गोल पोस्ट गुन्हा विश्रांतवाडीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

विश्रांतवाडीत किरकोळ वादातून तरुणाचा खून

पुणे : किरकोळ वादातून जमावाने केलेल्या गंभीर मारहाणीमध्ये युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना धानोरी परिसरात मंगळवारी( दि.२१) रोजी घडली.

सागर महादेव भालेराव असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री तरुणाचा खून झाला. विश्रांतवाडी पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागरची किरकोळ कारणावरून भांडण झाले. या भांडणातून दुसर्‍या गटातील ५ ते ६ जणांच्या टोळक्याने लाकडी पटट्यासह लाथाबुक्यांनी मारहाण करून पोबारा केला होता
त्यावेळी गंभीर जखमी झालेला सागर घरी आला. त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम यांनी भेट दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version