गोल पोस्ट महाराष्ट्र सनराईज इंग्लिश मीडिअम गुरुकुलच्या विश्वतेज बोबडेची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

सनराईज इंग्लिश मीडिअम गुरुकुलच्या विश्वतेज बोबडेची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

माढा, १२ फेब्रुवरी २०२१: श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित सनराईज इंग्लिश मीडिअम (गुरुकुल) या इयत्ता दहावी मधील विश्वतेज नागेश बोबडे याची दिनांक २० फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

१० फेब्रुवारी रोजी अरण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड स्पर्धेसाठी जिल्ह्यातून जवळ जवळ १५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये सबज्युनियर कंपाउंड गटात ५० मीटर अंतरामध्ये ३६० पैकी २९७ गुण मिळवून अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली.

कोणत्याही यशाचे गमक हे कष्टात आणि सातत्यपूर्ण प्रयत्नात असते. मेहनत करून यश प्राप्त करता येते हे यातून सिद्ध झाले. विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती रुजविण्यासाठी संस्था नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे. त्याचेच फलित या विद्यार्थ्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेतील निवडीवरून लक्षात येते.

यासाठी धनुर्विद्या मार्गदर्शक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.
वरील निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय योगेश बोबडे, सचिव सुरजा बोबडे, प्राचार्य सिद्धलिंगप्पा प्रभाकर, संस्थेचे कोऑर्डिनेटर शंकर सोनटक्के यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version