इंदापूर, दि. १९ जून २०२०: निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील वनविभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे नुकसान झालेल्या भागाला भेट दिली.
एकीकडे कोरोनाचे संकट आणी दुसरी कडे पावसाळा सुरु असताना इंदापूर तालुक्यातील काही गावात वनविभागाने नोटीस न पाठवता अतिक्रमणाची कार्यवाही केली आहे. यामध्ये गोखळी, तरंगवाडी, रजवडी, अंथुर्णे आणी पिंपळे या भागात गेली ४० ते ५० वर्षा पासून राहणाऱ्या लोकांची राहती घरे आणि शेती पिकांवर अतिक्रमणाची कार्यवाही केली आहे. त्यामुळे लोकांचे संसार उध्वस्त झाल्यामुळे लोक बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. या सर्वाची पाहणी करण्यासाठी नीरा भिमा सहकारी कारखाण्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी तेथील स्थानिकांशी संवाद साधला असता, ही कार्यवाही मंत्री दत्तामामा भरणे यांच्या सांगण्यावरून व राजकीय सुडबुद्धिने केल्याचे समोर आले आहे. यामध्ये मंत्री भरणे यांनी स्वता:च्या जवळील नातेवाईकांची अतिक्रमणाची कार्यवाही पासून वाचवलेचे प्रत्यक्ष भेटी दरम्यान अतिक्रमणाची कार्यवाही झालेल्या इतर उपस्थित लोकांनी राजवर्धन यांचे जवळ मते व्यक्त केले.
त्या जागेमध्ये लोक गेली कित्येक वर्षापासून राहत असून सदर ग्रामपंचायती मार्फत तेथे मुलभूत सुविधा निर्माण करून दिलेल्या आसताना देखील अशी कार्यवाही होते हे चुकीचे असल्याचे मत यांनी वेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
आज शेतक-यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन शेतीवर आधारीत अनेक व्यवसाय सुरु केले होते. त्याचे देखील मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या सर्वांचे नुकसानभरपाई शासना कडून मिळूवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी संस्था व सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व आम्ही प्रयत्नशील राहू असा विश्वास राजवर्धन पाटील यांनी या वेळी नुकसानग्रस्त उपस्थितांना दिला.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे