व्हिसा मुदत संपल्यामुळे हसनला भरावा लागला दंड

कोलकत्ता: बांगलादेश क्रिकेट संघातील राखीव सलामीचा फलंदाज सेफ हसन याला भारतात अधिक राहणे महागात पडले आहे. तला बांगलादेशात परतण्यासाठी एकवीस हजार सहाशे रुपयांचा दंड भरावा लागला. दिवस-रात्र कसोटी हरल्यानंतर बांगलादेश संघातील काही खेळाडू त्यादिवशी म्हणजेच रविवारी लगेच बांगलादेशला रवाना झाले. उर्वरित खेळाडू सोमवारी रवाना झाले ह्यात हसनचा ही त्यात समावेश होता. मात्र बोर्डिंग पास देताना विमानतळ अधिकाऱ्यांना व्हिसाची मुदत संपल्याचे निर्दशनास आले. त्याचा व्हिसा फक्त रविवारी संध्याकाळपर्यंत होता त्यामुळे त्याला प्रवास करण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर बुधवारी त्याला नवीन व्हिसा देण्यात आला आणि तो बांगलादेश रवाना झाला. मात्र दोन दिवस व्हिसा नसताना राहिल्यामुळे नव्या नियमानुसार त्याला या दोन दिवसांच्या वास्तव्यात दंड भरावा लागला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा