पंढरीच्या विठूरायाचे असे ही दर्शन

पंढरपुर, २ जुलै २०२० : वैष्णवांचा मेळा अर्थात पायी पंढरीची वारी करून पंढरपुरात दाखल होणारी वारक-यांची गर्दी. भुक तहान अडी अडचणी समस्या विसरून हरी नामाच्या गरजरात दंग होवून एकदा त्या विठुरायाचे सावळे रूप डोळे भरून पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातील हा वारकरी संप्रदाय देवशयनी आषाढी एकादशीला पंढरपुरात जमा होतो.

परंतू दरवर्षी प्रमाणे यावर्षी हा मेळा कोरोना वायरस मुळे भरलाच नाही याचे दुःख सर्व वारकरी संप्रदायाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

पंढरीत लाखोंच्यावर वारकरी भक्तगण जमा होतात. या प्रसंगी पंढरीत वारकरी भक्तगणांकडून श्री पंढरीरायाचे चार प्रकारचे दर्शन घेतले जाते. एक म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या चरणाचे दर्शन, दुसरे म्हणजे भगवंताचे श्रीमुख दर्शन, तिसरे म्हणजे कळस दर्शन व चौथे म्हणजे भगवंताचे स्वत:च्या रथामधील दर्शन.

रथा मध्ये श्री विठ्ठल व श्री राही रखुमाईच्या मूर्ती असतात व प्रतिवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला याच मूर्ती भव्य अशा रथातून नगर प्रदक्षिणेसाठी निघतात. ज्या कोणा वारकरी भक्ताला वरील तिन्ही दर्शन घेणे शक्य होत नाही अशा लोकांना देव साक्षात दर्शन देण्यासाठी नगर प्रदक्षिणा करतात असे मानले जाते.

या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथयात्रेला परवानगी नाकारल्यामुळे सदरील मूर्ती या ट्रॅक्टर मध्ये ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. तत्पूर्वी निघताना भगवंताची आरती पार पडली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा