कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश

माढा (सोलापूर), दि. २० जून २०२०: संपूर्ण देशात घेतल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कै विठ्ठलराव शिंदे विद्यालय आढेगावचे संकेत पोपट विरकर
व प्रज्वल भारत मारकड या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा कठीण स्वरूपाची असते जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासाचे योग्य नियोजन करून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जात असणाऱ्या संकेत पोपट विरकर याचे आई-वडील रोजंदारीवरती काम करून मोठ्या कष्टाने मुलांना शिकवतात. संकेत च्या यशाने आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले.

नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून त्याचे शिक्षण मोफत होणार आहे. प्रज्वल मारकड हा विद्यार्थी पण सर्वसामान्य कुटुंबातील आहे त्याच्या यशाने कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केला. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे शिक्षक, पालक सौ.गीता मारकड, भारत मारकड, सौ. रुक्मिणी विरकर, श्री पोपट विरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संकेत विरकर व प्रज्वल मारकड यांच्या कौतुकास्पद यशाचे कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक बंडु जाधव सर, केंद्रप्रमुख काळेसर, कावळे सर, जवळगे सर, मोटे सर, जगताप सर, शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन सत्कार केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा