नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२०: भारतात चायनीज कंपन्यांविरुद्ध विरोध सुरू असताना याचा चांगलाच फायदा भारतीय स्मार्टफोन कंपन्या करू पाहत आहेत. तसेच यासाठी भारतीय स्मार्टफोन कंपन्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
भारतीय मूळची स्मार्टफोन कंपनी लावा आपल्या झेड सीरिजच्या अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. तसेच कंपनीने आपल्या संकेत स्थळावर या स्मार्टफोन बद्दलची सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनटी किंमत किती असेल हे अजूनही अस्पष्ट आहे. अंदाजा लावला जात आहे की या स्मार्टफोनची किंमत १०,००० किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे. हा स्मार्टफोन केव्हा लाँच होणार आहे याची माहिती अजूनही गुपित ठेवण्यात आली आहे.
संकेत स्थळावर दिलेल्या माहितीनुसार, लावा झेड ९३ प्लस या स्मार्टफोन मध्ये ६.५३ इंचाचा एचडी + वायर ड्रॉप डिस्प्ले असणार आहे. आणि याचे रेसोल्युशनस १५६० × ७२० पिक्सेल असणार आहे. तसेच या फोन मध्ये २.० गिगा हर्टस ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच या फोन मध्ये २ जीबी, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज मध्ये लाँच करण्यात येणार आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी फोन मध्ये ४जी वीओएलटीई, ड्यूल-सिम, ब्लूटूथ ४.२, वाई-फाई ८०२.११ बी/जी/एन, ३.५ एमएम ऑडियो जैक, जीपीएस आणि माइक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. तसेच यात ४००० एमएएच बॅटरी पॉवर देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे