टोंगा, 18 जानेवारी 2022: न्यूझीलंडजवळ असलेल्या टोंगा या देशाजवळील समुद्रात टोंगा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. टोंगा येथील हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखीचा स्फोट झाला. यानंतर किनार्याकडं मोठ्या लाटा उसळत असल्यानं त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. लोकांना वाचवण्यासाठी जवळच्या उंच ठिकाणी पाठवण्यात आलंय. या लाटांमुळं आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. याचं मुख्य कारण म्हणजे या बेटावरील देशात दळणवळणाची सेवा तितकीशी चांगली नाही.
न्यूझीलंड आर्मीने सांगितलं की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास मदत मागितल्यास तयार आहे. सॅटॅलाइट इमेज मध्ये स्पष्ट दिसत आहे की, प्रशांत महासागराच्या पाण्यावर भव्य राख, पाण्याची वाफ आणि गॅसेसचा मोठा मशरूम वर उठताना दिसत आहे.
टोंगा हवामान सेवेनं सांगितलं की संपूर्ण टोंगासाठी त्सुनामी चेतावणी लागू होती आणि पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राच्या डेटामध्ये 80 सेमी उंच लाटा आढळल्या. जवळच्या फिजी आणि सामोआ येथील अधिकाऱ्यांनीही इशारे जारी केले आहेत आणि लोकांना भव्य आणि धोकादायक लाटा पाहता समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्याचं टाळण्याचं निर्देश दिले आहेत. टोंगामध्ये सुमारे 1,05,000 लोक राहतात.
जपानच्या हवामान संस्थेनं सांगितलं की, जपानच्या किनार्याजवळ पाण्याच्या पातळीत किंचित वाढ होऊ शकते, परंतु त्यामुळं नुकसान होण्याची शक्यता नाही. आयलँड बिझनेस न्यूज साइटने वृत्त दिलंय की पोलिस आणि सैन्य दलाच्या ताफ्याने टोंगाचे राजा तौपो VI यांना समुद्रकिनाऱ्याजवळील त्यांच्या राजवाड्यातून बाहेर काढलं. राजा तौपो VI सह अनेक रहिवाशांना वरच्या भागात हलवण्यात आलं आहे.
उपग्रह प्रतिमांमध्ये, धुराचे लोट आकाशात सुमारे 20 किलोमीटर (12 मैल) उंचीवर जाताना दिसतात. त्याच वेळी, 2,300 किलोमीटर (1,400 मैल) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या न्यूझीलंडमधील अधिकाऱ्यांनी स्फोटामुळं वादळाचा इशारा दिलाय. नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने म्हटलं आहे की, मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर न्यूझीलंडच्या काही भागांमध्ये किनाऱ्यावर अनपेक्षित लाटांसोबत मोठ्या आणि असामान्य लाटा येऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे