काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासाठी आज मतदान

नवी दिल्ली, १७ ऑक्टोंबर २०२२: काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज मतदान होतंय. मुख्य लढत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात आहे. मतदान सकाळी १० वाजता सुरू होईल आणि दुपारी ४ वाजता संपेल. या निवडणुकीत काँग्रेसचे ९,००० हून अधिक प्रतिनिधी मतदान करू शकतील. देशभरात ३६ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून ६७ बूथ आहेत, त्यापैकी ६ उत्तर प्रदेशात असतील. एका बूथवर २०० मतदान होणार. १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार. काँग्रेस पक्षाच्या १३७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा निवडणूक लढवली जातेय. AICC सरचिटणीस, राज्य प्रभारी, संयुक्त सचिव त्यांच्या गृहराज्यात किंवा AICC मुख्यालयात मतदान करू शकतात.

काँग्रेस मुख्यालयात तसेच देशभरात उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात मतदान होणार आहे. पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोमवारी दुपारी १२ वाजता 24 अकबर रोड, काँग्रेस मुख्यालय येथे मतदान करणार आहेत. तर राहुल गांधींसह ४७ प्रतिनिधी कर्नाटकातील बेल्लारी येथे मतदान करणार आहेत. ते येथील भारत जोडो यात्रेत सहभागी असून बेल्लारी येथील संगनकल्लू येथील शिबिराच्या ठिकाणी मतदान करणार आहेत. थरूर केरळमधील तिरुअनंतपुरम आणि कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये खर्गे मतदान करणार आहेत.

मतदानासाठी ३६ मतदान केंद्र आणि ६७ बूथ

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या (सीईए) सदस्याने सांगितले की, निवडणुकीत ३६ मतदान केंद्रे, ६७ बूथ असतील. यातील ६ बूथ यूपीमध्ये असतील. दिल्लीत दोन मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एक- २४ अकबर रोड (AICC मुख्यालय) येथे आणि दुसरे- दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय. दिल्लीत, प्रदेश काँग्रेसचे सुमारे २८० पीसीसी प्रतिनिधी डीपीसीसी कार्यालयात मतदान करतील.

काँग्रेसमध्ये २२ वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी मतदान

याआधी पक्षाच्या अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक २००० साली लढली गेली होती. त्यानंतर जितेंद्र प्रसाद यांना सोनिया गांधींकडून दारूण पराभवाला सामोरे जावं लागलं. या वर्षी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांनी पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वतःला बाहेर काढलंय, त्यामुळं २४ वर्षानंतर बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष बनण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोनिया यांनी १९९८ मध्ये पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा