लातूर: राज्यातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी राज्यातील पहिली “ट्री अम्ब्युलन्स” सेवा लातूरला सुरू करण्यात आली आहे.
शेतातील लोक विविध वृक्ष, फुलझाडे, फळझाडे घेऊन जातात. परंतु त्याची योग्य निगा राखलीच जाते असे नाही. त्यामुळे अशा झाडांचे त्यांच्या रोपांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून ही सेवा संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बामणे यांनी ही सेवा सुरू केली आहे.
झाडांच्या चांगल्या संगोपनासाठी दुरध्वनीनंतर १ तासाच्या आत ही सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे बामणे यांनी आमच्या प्रतिनिधिकडे सांगितले.