वाडा देविच्या रोगाने दोनशे मेंढ्यांचा मृत्यू

पुरंदर: नीरा नजीक जेऊर येथे मेंढ्यांना आलेल्या देवीच्या रोगामुळे आत्तापर्यंत दोनशे मेंढ्या मरण पावल्या आहेत. आणखी तिनशे पेक्षा जास्त मेंढ्या रोगग्रस्त असुन योग्य उपचारा अभावी मरणाच्या दारात उभ्या आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी या रोगाला औषध नसल्याचे सांगत असल्याने मेढपाळांचे वाडे आता बसणार हे निश्चित आहे.
दोन महिण्यापुर्वी पुरंदरच्या दक्षिण पुर्व भागातील राख, नावळी, कर्नलवाडी या गावात मेंढ्यांना फुटराॅट रोगाने ग्रासले होते. यावेळी शेकडो मेंढ्या मेल्या होत्या. त्यावेळी पशुवैद्यकीय अधिका-यांनी उपाय योजना करीत हा रोग आटोक्यात आणला.
मात्र तरी देखील शंभर पेक्षा जास्त मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. यावेळी पुरंदरच्या दक्षिण भागातील निरा नदीकाठच्या गावातील मेंढ्याना देवी या रोगाने ग्रासले आहे. या रोगाला कोणताच उपचार नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे येथील मेढपाळांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जेऊर येथील शेतामध्ये अनेक ठिकाणी मेलेल्या मेंढ्या पहायला मिळत आहेत.येथील बाळू दुषन जाधव याच्याकडे १३० मेंढ्या होत्या पैकी १०० मेंढ्या मेल्या, पांडुरंग दादा मोटे यांच्याकडे असलेल्या नव्वद मेंढ्या पैकी पन्नास मेढ्या मेल्या. महादेव बन्याबा मोठे यांच्याकडे सव्वाशे मेंढ्या होत्या त्यातील चाळीस मेंढ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेनबा मोटे यांच्याकडे १५० मेंढ्या होत्या. यापैकी त्यांच्या ४७ मिनिटांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे या लोकांकडील मेंढ्याच्या मृत्यूचा आकडा दोनशेच्यावर जात आहे. आता जिवंत असलेल्या मेंढ्या पैकी जवळजवळ सर्वच मेंढ्यांना या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात त्या मेंढ्या सुद्धा मृत्यू होणार हे निश्चित. त्यामुळे या मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून त्यांच्या जगण्याचा आधार, रोजी रोटी या रोगामुळे नष्ट झाली आहे. प्रशासनाकडून मात्र याबाबत कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे पुढील काळात अशा रोगांवर उपचार शोधावा अशी मागणी
लोकांकडुन होत आहे.

हा विषाणूजन्य आजार असून तो संसर्गजन्य आहे. हा आजार आल्यानंतर योग्य उपचार केला तरी १५ ते २० टक्के मृत्यू होते. या आजार येण्यापूर्वीच लसीकरण करणे महत्त्वाचे असते. मुख्यत्वे नीरा नदीकाठच्या गावांमधून हा आजार पाहायला मिळतो आहे . या आजारावर अजून पर्यंत कोणताही रामबाण उपचार नसून प्रतीक प्रतिजैविके देऊन व जखमांवर मलम लावून उपचार केले जातात. आजार झाल्यानंतर दिलेल्या औषधाचा दुष्यपरिणाम येण्यासाठी २१ दिवसाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मेंढपाळांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

– प्रशांत उटगे, पशुवैद्यकीय अधिकारी

माझ्या शंभर मेंढ्या मेल्या. मात्र तरी देखील महसूल किंवा पशुवैद्यकीय विभागाने दखल घेतली नाही.कोणी साधा पंचनामा देखील केला नाही. आमची उपजीविका यावर अवलंबून आहे.आम्हाला रोगातील काही कळत नाही.त्यातच हा रोग पहील्यांदाच आला.डॉक्टर येई पर्यंत निम्मी बेकरी मेली.विज्ञान खुप पुढ गेलं अस म्हणतात. सरकार पशुवैद्यकीय विभागावर कोट्यवधी खर्च करते मग या रोगावर औषध का नाही?

-बाळू जाधव, मेंढपाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा