नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांना गुंतवणूक करण्यास मदत करणाऱ्या सी.सी. थंपी या अनिवासी भारतीय उद्योजकाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
वढेरा यांच्यावर मनी लॉड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. थंपी यांनी लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वढेरा यांना मदत केल्याचा आरोप आहे.
थंपी हे अनिवासी भारतीय असून वढेरा यांचे निकटवर्तीय व जवळचे सहकारी मानले जातात. थंपी यांच्या स्कायलाईट एझेडई कंपनीचे, वढेरांच्या नावे भारतात शेअर्स आहेत.
वढेरा आणि भंडारी यांच्यासोबत जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पुरावा असल्याचा दावा ईडीनं केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी जमीन व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा पुरावा असल्याचा दावा ईडीने केला आहे.