मॉस्को, रशिया २५ जून २०२३: रशियामध्ये अंतर्गत कलहामुळे परिस्थिती चीघळली होती. रशियाने तयार केलेला वॅगनर ग्रुप बंड करून त्यांच्यावरच चालून आला होता. वॅगनर ग्रुपने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडली होती. वॅगनर ग्रुपचे सैनिक मॉस्कोवर चाल करुन येत होते. त्यामुळे संपूर्ण रशियामध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली. वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियामध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली, पण चोवीस तासानंतर आता पारस्थिती बदलल्याची माहिती आहे. वॅगनर ग्रुप आणि रशियन सरकारमध्ये करार झाला असुन करारानंतर आता वॅगनर ग्रुपचे योद्धे पुन्हा युक्रेनच्या दिशेने निघाले आहेत. काल या बंडामुळे रशियाच्या रस्त्यावर रणगाडे तैनात करण्यात आले होते.
वॅगनर ग्रुपचा चीफ प्रिगोजिनने, टेलिग्रामवरुन ऑडियो मेसेजकरुन वॅगनर सैन्यांना पुन्हा युक्रेनच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला. वॅगनर ग्रुपचे बंड शमवण्यात बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्जेंडर लुकाशेंको यांची महत्वाची भूमिका आहे. वॅगनर ग्रुप बरोबर कराराचा ड्राफ्ट तयार झाला आहे, असा लुकाशेंको यांनी दावा केला. प्रिगोजिन आणि रशियन सरकारमध्ये करार झाला आहे. यानंतर वॅगनर गटाच्या योद्धयांनी पुन्हा रणांगणाकडे कूच केली आहे. लुकाशेंको यांनी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिनसोबत चर्चा केली. रशियावर हल्ला रोखण्याची विनंती केलेली. राष्ट्रपती पुतिन यांनी वॅगनर सैन्याला सुरक्षेच आश्वासन दिले आहे, त्यामुळे आता वॅगनरचे सैन्य मॉस्कोच्या वाटेवारुन माघारी फिरले आहेत असे लुकाशेंको यांनी सांगितले.
वॅगनर ग्रुपच्या बंडानंतर रशियात परिस्थिती खराब झाली होती. मॉस्कोमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली, तिथल्या लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला होता. सोमवारी मॉस्कोमध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे. वॅगनर चीफने जाणूनबुजून हे बंड केले, वॅगनरच्या बंडावर संपूर्ण जगाच लक्ष आहे. रशियामधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्रप्रमुख व्लोदोमीर झेलेंस्की यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. पुतिन यांनी स्वत: हा धोका निर्माण केला असुन, पुतिन मॉस्कोमध्ये नसल्याच त्यांनी सांगितले. रशिया विरोधातील युद्धात आमचा विजय निश्चित आहे, असे झेलेंस्की म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर