वैनगंगा नदीला पुर; ८२ महामार्ग बंद तर २५ गावांचा तुटला संपर्क

भंडारा, १६ऑगस्ट २०२२: भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीने आपली धोक्याची पातळी ओलांडली असून शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. त्यामुळं महामार्गा वर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने रोडवर तीन फुटावर पाणी वाहत असून भंडारा-तुमसर महामार्ग बंद झालाय. भंडारा जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस चालू होता. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी वैनगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे.

त्यामुळं जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला आहे. यात सर्वाधिक मोहाडी तालुक्यातील २७, तुमसर येथील १५, पवणी येथील १०, साकोली ११, लाखनी ७, लाखांदूर ९, व भंडारातील ३ मार्गाचा समावेश आहे‌. तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश जोडनारा महामार्ग मागील दोन दिवसापासून बंद आहे.

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यात पुराचा सर्वात जास्त फटका बसल्याने तेथील १५० पेक्षा जास्त कुटुंबांना सरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर वैनगंगा नदिला नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे संपुर्ण ३३ दरवाजे अडीच मिटर ने उघडण्यात आले असून १५ हजार १८० क्युबीक्स पाण्याचा विसर्ग सूरु आहे.

महत्त्वपूर्ण बाब म्हणजे २०२० नंतर पुन्हा एकदा २०२२ ला भंडारा जिल्ह्यात पुरस्थिती उद्भवली आहे. तरी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा