गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महिला दिनानिमित्त सीए इन्स्टिट्यूट, रत्नागिरी शाखेतर्फे वॉकेथॉन

महिला दिनानिमित्त सीए इन्स्टिट्यूट, रत्नागिरी शाखेतर्फे वॉकेथॉन

रत्नागिरी, ९ मार्च २०२३ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. यानिमित्त भाट्ये किनाऱ्यावर वॉकेथॉन हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये रेखा यादव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला; तसेच द्वितीय क्रमांक ओवी गडाळे, तृतीय क्रमांक गौरी जोशी यांनी मिळविला.

यावेळी पोलिस अधिकारी बेंदरकर, राज्य जीएसटी अधिकारी स्वप्नाली चव्हाण, विभावरी पाटील, सीए इन्स्टिट्यूटचे रत्नागिरी शाखाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांच्यासह माजी अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, सीए आनंद पंडित आदी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

error: Content is protected !!
Exit mobile version