ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मुळे वानखेडे अडचणीत, सरकारने दिले कारवाईचे आदेश

मुंबई, 28 मे 2022: मुंबई क्रूझ प्रकरणी नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यन खानला क्लीन चिट दिली आहे. यानंतर सरकारने समीर वानखेडे यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. वास्तविक, एनसीबीने शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. यामध्ये आर्यन खानचे नाव नाही. आर्यन खानला क्लीन चिट मिळण्याबाबत एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी या प्रकरणात समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे. वास्तविक, समीर वानखेडे हे त्यावेळी या प्रकरणाचा तपास अधिकारी होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान अंमली पदार्थ जप्ती प्रकरणात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या चुकीच्या तपासासाठी सरकारने सक्षम अधिकाऱ्याला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाई करत आहे. त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उघड केला होता, ज्यांना नंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.

दुसरीकडे, डीजीएस एन प्रधान म्हणाले की, जर पहिल्या तपास पथकाने चूक केली नसेल, तर एसआयटी तपास का हाती घेईल? काही उणिवा होत्या, तेव्हाच एसआयटीने केस घेतली. या उणिवा दूर करण्यासाठी किंवा किमान पुढील कार्यवाही योग्य आहे, हे लक्षात घेऊन कारवाई करण्यात आली.

पुन्हा केली जाऊ शकते तपासणी

एनसीबीच्या महासंचालकांना विचारण्यात आले की, ज्या सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही, त्यांची अधिक चौकशी होणार का? यावर डीजी म्हणाले, हा तपासाचा विषय आहे. काही पुरावे सापडल्यास केस पुन्हा सुरू करता येईल. एवढेच नाही तर छापा आणि तपासादरम्यान हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून क्रूझवर छापा टाकणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे संकेत एनसीबीच्या महासंचालकांनी दिले आहेत.

एनसीबी डीडीजी (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंह काय म्हणाले…

आम्हाला आर्यनविरुद्ध पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळेच आम्ही त्याच्यावर आरोपपत्र दाखल करत नाही. आमची जी काही चौकशी झाली आहे, ती निष्पक्ष चौकशी झाली आहे. ज्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही अशा सहा जणांविरुद्ध आम्हाला पुरावे मिळालेले नाहीत. उर्वरित 14 पैकी 13 जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून सापडलेल्या इतर पुराव्यांवरून हे सिद्ध होते, त्यांनी ड्रग पॅडलरकडून ड्रग्स घेतले आणि ते मित्रांना उपलब्ध करून दिले.

मी हे स्पष्ट करू इच्छितो की, जे ड्रग्स सापडले आहे ते आर्यन खानचे नव्हते हे प्राथमिक तपासातच स्पष्ट झाले आहे. व्हॉट्सअॅप चॅट आर्यन खानला या प्रकरणाशी जोडत नाही. त्यांनी सांगितले की, वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही ज्यामुळे त्याने ड्रग्स घेतल्याचे सिद्ध झाले नाही.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य…

क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनला क्लीन चिट दिल्याची बातमीही मी ऐकली आहे, एनसीबी ही व्यावसायिक एजन्सी आहे, त्यांच्याकडे पुरावे नसतील त्यामुळे त्यांनी क्लीन चिट दिली असावी, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले..

6 जणांची निर्दोष मुक्तता, 14 जणांवर आरोप निश्चित

एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खान, अवीन साहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा, मानव सिंघल यांची नावे नाहीत. आरोपपत्रात 14 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच या लोकांवर खटला चालवला जाईल.

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी टाकला छापा

एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर छापा टाकला. यामध्ये त्यांनी आर्यन खानसह त्याचे दोन मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना अटक केली. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळून आले नाही. अटकेनंतर आर्यन खानला मुंबईच्या फोर्ट कोर्टाने एनसीबीच्या कोठडीत पाठवले होते. कोठडीत ठेवल्यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा