वर्धा नगरपरिषदेच्या भूमिगत गटार योजनेची चाचणी सुरू, दररोज तीन लाख लिटर पाण्यावर होणार मलनिस्सारण प्रक्रिया

वर्धा, २३ ऑगस्ट २०२३: नगर परिषद प्रशासनाने शहरात भुयारी गटार योजना कार्यान्वित केली असून, त्याचा मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) स्मशानभूमी संकुल पुलफैलमध्ये तयार करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या योजनेची चाचपणी सुरू आहे. पाणी एसटीपीपर्यंत पोहोचून तेथून पाणी सोडले जात आहे.

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून भुयारी गटार योजनेचे काम सुरू असून, त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. घरांमधून शौचालयातून बाहेर पडणारे सांडपाणी भुयारी गटार योजनेच्या पाइपलाइनमधून एसटीपीमध्ये नेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची ही संकल्पना आहे. नाल्यातील घाणीची समस्या १०० टक्के दूर होणार आहे, प्रशासन चाचणी सुरू झाल्यापासून दररोज तीन लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती प्रशासना कडून देण्यात आली आहे.

प्राथमिक स्थितीत सीवरेजचे ७०० कनेक्शन जोडल्याची माहिती असून, यामध्ये लक्ष्मीनगर, गोंड प्लॉट, आनंदनगर व काही बाजार परिसर असून काही ठिकाणी परवानगी न मिळाल्याने पाईपलाईन जोडण्याचे काम थांबुन सुरू आहे. चेंबरचे काम प्रलंबित आहे. त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, महादेवपुरा, अशोक नगर व इतर काही भागांचा समावेश आहे. जोडणी न दिल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची समस्या निर्माण होत आहे. इंटरकनेक्टचे काम पूर्ण करून समस्या सोडवली जाईल, असे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा