मुंबई, २१ ऑगस्ट २०२०: गेल्या दोन ते तीन आठवड्यापासून राज्यामध्ये सक्रिय पाऊस सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, विदर्भ, मराठवाडा या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आता गणेशोत्सव देखील सुरू होतोय. पण, येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने दिली आहे. मुंबई सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने सखल व काही महत्वाच्या भागामध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर सातत्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून आगामी ४८ तासांसाठी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भाग व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
याच बरोबर समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासांत मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी