राज्यात पुढच्या ३ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई, ५ सप्टेंबर २०२१: मधल्या काळात पावसाने दडी घेतली होती. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने चार दिवस पावसाचा इशारा दिला होता. या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होताना दिसला. मात्र, आता पुन्हा हवामान खात्याने राज्यात पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे.
या पावसाचा सर्वाधिक प्रभाव कोकणात असणार आहे. यासह मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर असणार आहे. यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता असून रत्नागिरी, सातारा, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
५ सप्टेंबरला रत्नागिरीसह सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट
हवामान विभागानं उद्यासाठी ५ सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
६ सप्टेंबरला कोकणासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, वर्धा, नागपूर. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
७ सप्टेंबरला बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, औऱंगाबाद, बीड, परबणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलडाणा, जळगाव जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा