कार्टुन पाहताय…पण सावधान …

पुणे, २९ जुलै, २०२२: ऑफिसमधून घरी गेले, दिवसभराचा ताण नको, विरंगुळा म्हणून कार्टून पहायला सुरुवात केली. कॉलेजमधून दमून आलेल्या मुलाने कंटाळा आला म्हणून माझ्याबरोबर कार्टुन पहायला सुरुवात केली. तब्बल पाच तास सतत आम्ही कार्टुन पहात होतो. पण नंतर लक्षात आंल की, असे आपण आल्यापासून कार्टुन समोरच आहोत. पण हे नक्की योग्य की अयोग्य… यासाठी मी एका मानसोपचार तज्ञांशी सल्ला मसलत केली. तेव्हा त्यांनी सांगितलेले मुद्दे हे भयानक आणि सावधान रहाण्याबाबत होते. त्यांनी सांगितलं की.
सध्याच्या काळातलं जग हे कार्टुनमय झालं आहे. लहान मुलांबरोबर, मोठी मुलंच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकपण कार्टुनच्या आहारी गेले आहे. तहान भूक विसरुन कार्टुनमुळे केवळ हास्स्यास्पद आयुष्य असतं अशी त्यांची समजूत होते. ज्यातून बाहेर येणं नंतर अशक्य होतं.

पालक मुलांना कार्टुनच्या नावाखाली इमोशनल ब्लॅकमिल करतात, ज्यामुळे नंतर मुले कार्टुनला जवळ करतात.
कार्टुन हे काल्पनिक आहे, याचा मुलांना विसर पडतो. त्याच विश्वात ते कायम रमत राहतात आणि नंतर वास्तव आयुष्याला विसरुन त्यांना स्क्रिझोफेनिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो.
अभ्यास किंवा चिंतन यांसारख्या गोष्टींपासून मुले लांब पळतात. ज्यात त्यांना कार्टुनमुळे रस वाटत नाही. मग ते अशा प्रलोभनांना बळी पडतात.

काही मुले तर कार्टुनच्या एवढे आहारी जातात, की जर घरच्यांनी कार्टुन दाखवले नाही तर ते घरच्यांना आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करतात किंवा काहींनी तर आत्महत्या करण्याचे धाडसही केले आहेत.

उपाय

मुलांना अशी कार्टुन्स शक्यतो पाहू देऊ नका. दाखवायची असल्यास वेळ ठरवून द्या.

जेवताना, अभ्यास करताना कार्टुन्स पाहू देऊ नका. त्यामुळे त्यांचे जेवणात आणि अभ्यासात लक्ष लागणार नाही.

त्यांना या गोष्टीची सतत कल्पना द्या, की कार्टुन्स हे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.

मुलांना संध्याकाळी मैदानी खेळ खेळायला पाठवा. ज्यामुळे त्यांची शारिरीक दमछाक होऊन, त्यांना कार्टुन किंवा टिव्ही पहाण्यात स्टॅमिनाच उरणार नाही.

रोज मुलांशी, घरातल्या ज्येष्ठांशी एक तास दिवसभरात काय केलं आणि उद्याचा कार्यक्रम काय असेल, यावर गप्पा मारा.

महिन्यातून एकदा परगावची किंवा ट्रेक यांसारखे प्लॅन करा. जेणेकरुन त्यांना कार्टुन्सचा विचार करण्याइतका वेळ मिळेल.

एकेकाळी अशी कुठलीच साधने अस्तित्वात नव्हती. पण त्यामुळे मानसिक विकारांचे प्रमाण कमी होते. पण आता मोबाईल, इंटरनेट सांरख्या गोष्टींमुळे मुंलाच्या मानसिक आजारात भर पडली आहे. हे सत्य आपल्याला मनावर दगड ठेवून स्वीकारावेच लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा