गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध ग्रँड कॅनॉलच्या पाण्याचा रंग बदलला, अधिकाऱ्यांकडून तपास सुरू

प्रसिद्ध ग्रँड कॅनॉलच्या पाण्याचा रंग बदलला, अधिकाऱ्यांकडून तपास सुरू

व्हेनिस, २९ मे २०२३: अलीकडेच सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये व्हेनिस ग्रँड कॅनॉलमधील पाणी रहस्यमयपणे हिरवे असल्याचे दिसत आहे. वास्तविक हा धक्कादायक फोटो इटलीतील व्हेनिस शहरातलाच आहे. जिथे प्रसिद्ध ग्रँड कॅनॉलच्या पाण्याचा रंग अचानकपणे बदलला. रविवारी सकाळी व्हेनिसचे लोक हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले.

रियाल्टो पुलाजवळ राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना ग्रँड कॅनॉलच्या पाण्याच्या बदललेल्या रंगाची माहिती दिली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हेनेटोचे प्रादेशिक अध्यक्ष लुका जिया यांनी माहिती दिली की व्हेनिसच्या ग्रँड कॅनॉलचा एक भाग हिरवा दिसत आहे, ज्याची माहिती रियाल्टो पुलाजवळ राहणाऱ्या लोकांनी दिली आहे. याबाबत माहीती मिळताच स्थानिक प्रशासनाने एक महत्वाची बैठक आयोजीत केली तसेच पोलीस सध्या तपासात गुंतले आहेत.

बीबीसीच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले असून त्याची तपासणी केली जात आहे. अद्याप या पाण्याचा रंग अचानक बदलण्यामागील कारण जरी समोर आले नसले तरी काही लोक याचा विविध प्रकारे अंदाज लावत आहेत. व्हेनिसच्या ग्रँड कॅनॉलचा रंग बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही.

हा तोच प्रसिद्ध ग्रँड कॅनॉल आहे जिथे बॉलीवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचे ‘दो लफ्जों की है दिल की कहानी’ हे प्रसिद्ध गाणे शूट करण्यात आले होते. गाण्यात दिसणारे हे सुंदर दृश्य व्हेनिसचेच आहे, जे आजही लोकांना पुन्हा पुन्हा पाहायला आवडते.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version