पाणी पिण्याच्या सवयी- आरोग्यासाठी महत्त्वाच्या ..

पुणे ३१ जुलै, २०२२: पाणी हे जीवन आहे असं आपण नेहमीच म्हणतो. पण पाणी प्यायल्याने विकार होऊ शकतात, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. योग्य प्रकारे पाणी न प्यायलाने विकार होऊ शकतात, याची तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल. पाणी योग्य पद्धतीने न प्यायल्याने पोट फुगून आतड्यांवर ताण येऊ शकतो. पोटाचा आकार वाढून अति लठ्ठपणा होऊ शकतो. असे एक ना अनेक विकार आपल्याला होऊ शकतात. यासाठी योग्य पद्धतीने पाणी प्या.

१. सकाळी उठल्यानंतर अनुष्या पोटी- शौचाला जाण्याआधी कोमट पाणी प्या. जेणे करुन रात्रीत जमा झालेले टॉक्सीक शौचावाटे बाहेर पडण्यास मदत होईलं.

२. काही लोक मध, लिंबू आणि कोमट पाण्याचे सकाळी सेवन करतात. पण त्यामुळे पोटात ऍसीड तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो नुसते पाणी प्यावे.

३. दिवसाला १६ ग्लास म्हणजेच तीन ते चार लीटर पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे त्वचेला पुरेसे पाणी मिळून त्वचा शुष्क होत नाही.

४. फ्रिजमधले पाणी हे कायम शरीरास हानीकारक आहे. त्यामुळे तसे पाणी न पिता साधे पाणी प्यावे. अन्यथा हे पाणी नॉर्मल तापमानापर्यंत आणून मगच प्यावे.

५. कायम पाणी बसून प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने हाडांवर ताण येऊन हाडे कमकुवत होऊ शकतात.

६. शक्यतो झोपण्याच्या आधी एक तास पाणी प्यावे. पाण्यामुळे ब्लॅडर भरल्याने लघवी व्यवस्थित होते. ज्यामुळे ब्लॅडर व्यवस्थित कार्यरत राहते.

७. जेवण झाल्यानंतर किमान ४० मिनिटे पाणी पिऊ नये. अन्न जठरात जाऊन पचनाची क्रिया सुरु होण्यास किमान ४० मिनिटाचां अवधी लागतो. त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये.

८. जेवताना घास खाल्यानंतर काही जणांना पाणी प्यायची सवय असते. पण त्यामुळे घासामध्ये मिसळणाऱ्या लाळेचं कार्य व्यवस्थित न झाल्याने अपचन होण्याची शक्यता असते.

९. घशाला कोरड पडू नये किंवा घशाला त्रास होऊ नये, यासाठी सतत पाणी पित रहावे. जेणेकरुन मन आणि शरीर शांत रहाते.
या सर्व गोष्टींचे नीट पालन केल्यास पाणी हे खरोखरीच जीवन आहे, याची प्रचिती होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा