जळगाव, १३ जुलै २०२३ : जळगाव जिल्ह्यातील सर्वांत मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याची आवक वाढली असून, धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात १९,७७९ क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग होत आहे.
भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आज सकाळी सहा वाजता धरणाचे १० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे १९.७७९ क्युसेक्स वेगाने विसर्ग तापी नदीपात्रात होत आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने कोणीही तापी नदीपात्रात जाऊ नये, तसेच गुरेढोरे नदीच्या पात्रात सोडू नये, याची खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर