उन्हाच्या झळांनी पाणीटंचाई गंभीर! टँकरमाफियांची लूट सुरूच

66

पुणे १६ फेब्रुवारी २०२५ : उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात पाणीटंचाई तीव्र झाली असून, महापालिकेच्या टँकरवर नागरिकांची वाढती गर्दी दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात महापालिकेने तब्बल ३९,६९२ टँकर पाणीपुरवठा केला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत ७,११२ टँकरने अधिक आहे. मात्र, टँकरमाफियांची चांदी होत असून नागरिकांकडून मनमानी दराने पैसे उकळले जात आहेत.

टँकर पॉइंट वाढले, पण पाणीटंचाई कायम

महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुःशृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग येथे टँकर पॉइंट निश्चित केले आहेत. मात्र, शहरासह नव्याने समाविष्ट गावांमधील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या सुटण्याऐवजी वाढत आहे. केशवनगरसारख्या भागात नळाचे पाणी अनियमित आणि कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांना पाण्यासाठी ताटकळत राहावे लागते.

महापालिकेचा टँकर ६६६ रुपयांत, पण विक्री दीड ते दोन हजारांत!

महापालिकेच्या टँकरसाठी ६६६ रुपये अधिकृत शुल्क असून, खासगी टँकरसाठी १,२८२ रुपये चलन भरावे लागते. मात्र, टँकरमाफिया या पाण्याची मनमानी दराने विक्री करत आहेत. एक टँकर १,५०० ते २,००० रुपये दराने विकला जात असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. प्रशासनाकडे या लूटप्रकरणी कोणतेही नियंत्रण नसल्याने टँकरमाफियांचा सुळसुळाट वाढत आहे.

रहिवाशांची होरपळ – ‘पाणी गरजेचं, त्यामुळे पैसे मोजावेच लागतात’

धायरीतील रहिवाशांनी पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “महापालिकेचे पाणी नियमित मिळत नाही, त्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. टँकरमाफियांच्या मनमानी दरांनी आम्हाला लुटले जाते, पण पाणी गरजेचे असल्याने पैसे द्यावेच लागतात,” अशी खंत स्थानिक व्यक्त करत आहेत.

टँकर मागणीतील वाढ – आकडे सांगतात चित्र

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांत टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे:

पाणीटंचाईवरील उपाययोजना केव्हा ?

शहरात उन्हाळ्याच्या तडाख्याने पाणीटंचाई वाढत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने टँकरमाफियांवर कारवाई करावी, तसेच टँकरचे दर नियंत्रित करावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा नागरिकांची ही लूट असाच सुरू राहणार आहे!

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा