पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक पार

पुणे, १९ ऑक्टोबर २०२०: चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी स्विकारलेल्या योजनेचा आज गिरीष बापट यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधणे, वितरणाच्या पाईप लाईन टाकणे, पाण्याचे मीटर बसविणे व पंपिंग स्टेशन बांधणे या कामांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

नियोजित 84 टाक्यांपैकी दहा टाक्या बांधून तयार आहेत. वीस टाक्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील. तीस टाक्या पूर्णत्वास गेल्या आहेत. बाकीच्या टाक्या वनविभाग, पोलीस, रेल्वे व राज्य सरकार यांच्याकडून परवानगी मिळाल्यावर पूर्ण होतील अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

एकूण 3,18,574 पैकी 23,225 मीटर (७.२९%) बसविण्यात आले आहेत. 1670 किलोमीटरची पाईप लाईन टाकायची आहे. त्यापैकी तीनशे किलोमीटर टाकून झाली आहे (१८%). आतापर्यंत तीनशे किलोमीटर लाईन टाकून झाली आहे. तथापि तेथील डक्ट्ची व्यवस्था मार्गी लागलेली नाही. भविष्यात याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे, असे मत गिरीष बापट यांनी मांडले. जुन्या टाक्यांची पाहणी करावी. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधी लागणार आहे. त्यावर स्थायी समितीचे अध्यक्ष व महापौर यांनी चर्चा करावी. त्यांनी कर्जरोख्याचे नियोजन करावे. सुरूवातीला एका विभागात या योजनेचा पथदर्शक प्रकल्प उभा करावा. मीटर बाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करावेत. लोकप्रतिनिधींना वितरण व्यवस्थेची माहिती द्यावी. इत्यादी मुद्दे त्यांनी या वेळी उपस्थित केले.

महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष स्थायी समिती हेमंत रासने, सभागृहनेते धीरज घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, मुक्ताताई टिळक, नगरसेवक राजेश यनपुरे, अमोल बालवडकर, गणेश बिडकर, दीपक पोटे, आदित्य माळवे, अजय खेडेकर, धनराज घोगरे, उमेश गायकवाड, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल, मुख्य अभियंता श्री पावसकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे .

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा