जेजुरीत सफाई कामगारांच्या सुरक्षा करिता अवलंबली जलवाफ उपचार पद्धती

पुरंदर, दि. १४ जुलै २०२०: सद्या पुरंदर तालुक्याला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने चांगलाच विळखा घातला असून खंडोबाच्या जेजुरीला ही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. ही जेजुरी स्वच्छ ठेवण्याचे काम येथील सफाई कर्मचारी करतायत. त्यांच्या साठी येथील ठेकेदाराने जलावाफ उपचार पद्धतीचा अवलंब केला असून या उपचार पद्धतीने चांगला परिणाम होत असल्याचे येथील कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

अगदी प्रथम लॉकडाऊन काळापासून आपला जीव धोक्यात घालून जेजुरी नगरपालिका सफाई कामगार, जेजुरी व नागरिकांच्या स्वच्छता व आरोग्याची खास  काळजी घेत आई. परंतु या कामगारांच्या सुरक्षा व काळजीचे काय? हा मोठा प्रश्न येथील पालिका ठेकदार यशश्री संस्थेचे प्रमुख गोपाल मोहरकर यांच्या पुढे पडला होता.

सोशल मिडिया वरील आयुर्वेदिक वाफ जल उपचार पद्धतीचा प्रयोग बघितला आणि मोहरकर यांनी आपले सहकारी विनोद लाखे भानुदास दावलकर भगवान लाखे आरोग्य निरीक्षक प्रमुख सुभाष गायकवाड झोनल अधिकारी बाळासाहेब बागडे  यांच्या सहकार्याने तो प्रयोग अमलात आणला आहे. शक्यतो सफाई कामगारांना श्वसनाचा त्रास होतो असतो यात  श्वास नलिका आणि अन्न नलिका ह्या दोन वेगळ्या आहेत.

यात नाकाच्या हाडांमागील पोकळीत विषाणू जंतू जाऊन अडकतात व ते पुन्हा फुफूसात जाऊन  धोका निर्माण होण्याची दाट शक्यात असते जर त्या जंतूंना पॅरानेझल सायन मध्येच मारायचं असेल तर स्टीम घेणे अती आवश्यक असते.आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून वाफ घेण्याच्या प्रक्रियाचा घरगुती आणि उपलब्द आयुर्व्दिक साहित्यातून वाफ जल उपचार यंत्रांना वापरून कामगार सुरक्षा करण्याचा कुशल प्रयोग ठेकादार मोहरकरांनी राबविला आहे.

त्या मुळे अद्यापतरी जेजुरी नगरपालिकाच्या महिला पुरुष सफाई कामगारना कोरोना ची लागण झाल्याचे दिसून आले नाही. जेजुरीपालिका कामगारना पालिकेच्या जागेतच दररोज कामावर येताना आणि पुन्हा कामावरून परत जाताना हि आयुर्वदिक वाफ दिली जात असते. या प्रयोगाची पहाणी जेजुरी नगरपालिका मुख्याधिकारी पूनम कदम यांनी केली असून त्यांनी या कयाबाबत समाधानही व्यक्त केले आहे. यावेळी सर्व सफाई कामगारांनी मात्र जेजुरी कोरोना  मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली.

याबाबत बोलताना गोपाल मोहरकर म्हणाले की, ६० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरसला पांगळी करते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. ७० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ हि व्हायरसला पूर्ण पणे मारते.  संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग, हा स्टीम नीतीचा वापर करत आहे. या नीतीचा आणि सुरक्षित अंतर ठेवणे व मास्क वापरणे  गरम पाणी पिणे आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन केल्यास आपल्याला कोरोनाचा प्रदुर्भाव टाळत येईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा