आम्ही सगळे संघटनेत आहोत, मी संघटनेच्या माध्यमातून काम करणार, रविकांत तुपकर यांची माध्यमांनां प्रतिक्रिया

बुलढाणा, ८ ऑगस्ट २०२३ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर रविकांत तुपकर यांनी थेट आरोप केले होते. तसेच त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता तुपकर हे भाजपमध्ये जातील अशा चर्चां रंगल्या होत्या. तर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याचदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने थेट तुपकर यांना आदेशच काढला होता.

रविकांत तुपकर यांना पुण्यात होणाऱ्या बैठकीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर तुपकर हे नॉटरिचेबल झाले होते. यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. मात्र आज तुपकर यांनी थेट मिडियाच्या समोर येत आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले.

यावेळी आपण राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुपकर म्हणाले संघटनेच्या माध्यमातून मी काम करणार आहे. आम्ही सगळे संघटनेत आहोत त्यामुळे त्या दृष्टीने काम चालू राहील. माझ्या दृष्टीने शेती आणि शेतीचे प्रश्न महत्वाचे आहेत. संघटना आमची सगळ्यांची आहे. काम करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहे,असे तुपकर म्हणाले. तुमचे प्रश्न शिस्तपलांन समितीसमोर का मांडत नाही? यावर ते म्हणाले, हे सर्व विषय मी वारंवार मांडले आहेत. राजू शेट्टी याच्या पुढे तसेच संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांन समोर अनेकवेळा मांडले आहेत पण त्याच्यावर कृती झाली नाही, असे रविकांत तुपकर म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा