भारत-चीन वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत : अमेरिका

यु एस, दि. १७ जून २०२० : गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षाकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या चकमकीत २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत, तर चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. भारत आणि चीनमधील तणावावरही अमेरिका लक्ष ठेवून आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर जे काही चालले आहे त्यावर अमेरिकेचे पूर्ण लक्ष आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने २० सैनिकांच्या शहीद झालेल्याची पुष्टी केली आहे, आम्ही त्यांच्या कुटूंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. भारत आणि चीन दोघेही सहमत आहेत की त्यांना हा वाद मिटवायचा आहे आणि सीमेवरुन सैन्य माघार घ्यायचे आहे.

अमेरिकेच्या मते, २ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत-चीन सीमा दरम्यानच्या तणावाबाबत फोनवर चर्चा झाली. दोन्ही देशांनी हा वाद शांततेत संपवावा अशी आमची इच्छा आहे.

संयुक्त राष्ट्रांनीही चिंता व्यक्त केली

अमेरिकेव्यतिरिक्त संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत आणि चीनमधील संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना संयम राखण्याचे आवाहन केले. यूएनचे सहयोगी प्रवक्ते एरी कानेको म्हणाले, “वास्तविक नियंत्रण रेषेवरील भारत आणि चीनमधील हिंसाचार आणि मृत्यूच्या बातम्यांबद्दल आम्हाला काळजी वाटते.” दोन्ही बाजूंना अत्यंत संयम ठेवण्याचे आवाहन करत आहोत आहे.

मंगळवारच्या घटनेनंतर भारत आणि चीनमधील या तणावाची चर्चा जागतिक स्तरावर होत आहे. अमेरिकन, ब्रिटनच्या मीडियाने या घटनेचे मोठ्या प्रमाणात वृत्तांकन केले आहे आणि परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे म्हटले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा