‘आम्ही बाळासाहेब… मग तुम्ही शिवराय…; शिंदे गटाचा प्रति हल्ला

मुंबई, २४ सप्टेंबर २०२२: एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शुक्रवारी डोंबिवली येथे हिंदूगर्वगर्जना नावाने संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिंदे गटाचे आमदार, खासदार यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी, उद्धव ठाकरे यांच्या एका टीकेला शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बंडखोर आमदार हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का वापरत आहेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावर दादा भुसे यांनी ‘आम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नये, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान दादा भुसे यांनी ठाकरेंना दिले.

बाळासाहेब ठाकरे हे एका व्यक्तीचे बाप नाहीत, ते सर्व शिवसैनिकांचे बाप आहेत. बाळासाहेबांना राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केले आहे. शिवसैनिकांच्या बापाला कमी लेखू नका. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावतो, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावा आणि जनतेच्या दरबारात जा, राज्याचे बंदरे, मत्स्यविकास मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री असताना ते शिवसैनिकांना भेटले नाहीत आणि आता सर्वांना भेटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच महिन्यांपासून कामाला लागले आहेत. हे काम यापूर्वी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केले नसल्याचेही भुसे म्हणाले.

शिंदे गटाची रायगड जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक गुरुवारी आमदार महेंद्र दळवी यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी पार पडली. दसरा मेळाव्याच्या नियोजनासाठी ही बैठक होती. यावेळी भुसे यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर टीका करत आहेत, तसंच त्यांचे वडीलही पळून गेले. याबाबत भुसे यांनी समाचार घेतला. शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हिताचे विविध निर्णय घेतले आहेत. उपस्थितांना जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. दसरा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ‘अडीच वर्षे घरी’ आमदार जागे झाले तेव्हा आम्ही घरातील वाद संपवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरेंची मानसिकता आमदारांच्या बाजूने बदलत होती. पण संजय राऊत, भास्कर जाधव, ठाकरे यांचे विचार बदलत होते. अडीच वर्षे घरी बसून कोणतेही काम केले नाही. निर्णय घेण्याबाबत आम्ही उद्धव यांना सांगत होतो. मात्र, अजित पवार भंगार बनवण्याचे काम करत असल्याने आमची अडचण झाली, असे भुसे म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा