मुंबई, ५ ऑगस्ट २०२०: प्रख्यात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये पत्रकार आर्णब गोस्वामी यांच्यावर ट्विटर वर निशाणा साधत त्यांनी चित्रपटाचे नाव घोषित केले आहे.”अर्णब” द न्यूज प्रोसिट्यूट( “ARNAB” THE NEWS PROSTITUTE) असे नाव आहे. तर हा चित्रपट अर्णब गोस्वामीच्या पत्रकारितेवर असल्याचे बोलले जात आहे. त्या बरोबरच त्यांनी एक ट्विट केले ज्यामध्ये “करण जोहर, महेश भट, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या सह अनेकांना माझा सल्ला आहे. केवळ चित्रपटासाठी तयार होण्यापेक्षा आणि चित्रपटात हिरो होणं गरजेचं नाही. पण, अर्णब गोस्वामी सारख्या खलनयकाविरोधात आवाज उठवणं गरजेच आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
या चित्रपटाबद्दल सांगताना राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटातून लोकांना कशा पद्धतीने कोणतीही वृत्तवाहिनी हि लोकांच्या मानसिकतेवर कशा पद्धतीने त्यांना भुलवले जाते याचा संपुर्ण खुलासा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी परिपुर्ण तयारी केली असून याच्यावर चांगला आभ्यासपुर्ण शोध केल्याचे ही ते म्हणाले, तसेच या चित्रपटात ते सुशांत सिंह राजपूतच्या घटनेचा वापर करणार असून तो मुद्दा सध्या ताजा आहे असेही ते म्हणाले.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मानीं या दिवसांमध्ये एकच्या नंतर एक अशा ठोक चित्रपटांच्या घोषणा केल्या आहेत. ज्या मध्ये २०२० मधील त्यांचा हा १२ वा चित्रपट असून, ते त्यांच्या चित्रपटाबद्दल वाद नेहमीच जोडला जावा अशी अपेक्षा ठेवतात ज्यामुळे त्यांचे हे चित्रपट सतत मिडीया मध्ये चर्चेचा विषय ठरतात. तर त्या बरोबरच येणारे अगामी चित्रपट देखील त्यांच्याच डिजीटल प्लेटफाॅर्मवर येणार असून राम गोपाल वर्माने आत्तापर्यंत ४ चित्रपट रिलीज केले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी