मुंबई, ९ सप्टेंबर २०२०: राज्यात कोरोना व्हायरसची परिस्थिती आटोक्यात येत नाही. रोज कोरोना रुग्णांचे नवनवीन विक्रम मोडले जात आहेत. तसेच कोरोनामुळे खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच परिस्थितीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “देशात कोरोना व्हायरसने विक्रमी ४२ लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र आपण कोरोना सोडून इतर सगळ्या विषयांमध्ये लक्ष घालत असल्याचं मत” उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलं आहे.
उर्मिलाच्या सांगण्यानुसार, “देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ४२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत आपल्या भारत देशाने ब्राझिलला मागे सोडलं आहे. पण या विषयामध्ये कोणालाही रस दिसत नाही. आपण नको त्या विषयांवर चर्चा करत बसलोय.”
सध्याच्या घडीला देशात कोरोनाबाधितांची संख्या ४३ लाखांच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८९,७०६ नवे कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. याशिवाय १११५ रूग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे