मंगळवेढा, सोलापूर ५ डिसेंबर २०२३ : सोलापूर जिल्ह्यामधील बोहाळीसह तिसंगी, सोनके, उंबरगाव, कोर्टी या पाच गावाच्या विकासासाठी कोर्टि रस्ता, तिसंगी रस्ता आणि सोनके रस्ता करून हिवरेबाजार प्रमाणे बोहाळी आणि या परिसरातील गावांचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांनी दिले. बोहाळी, तिसंगी, कोर्टी, सोनके,उंबरगाव या भागातील असलेले दोन ते तीन बंधारे निरा, भाटगर पाण्याने भरल्याने शेतकऱ्यातून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्याचे पूजन सोमनाथ अवताडे यांनी केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांनी वारंवार आमदार समाधान आवताडे यांच्याकडे भेट घेऊन पाण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न विचारात घेऊन या प्रश्नाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्याने या भागात नीरा, भाटगर चे पाणी कॅनलद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांमधून उत्साह पाहायला मिळत होता. आज या पाचही गावातील नागरिक एकत्र आले, प्रथमच आलेल्या पाण्याचे पूजन सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. या पाण्यामुळे भविष्यात या भागातील बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून मिळावे अशी मागणी ही ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. त्याचबरोबर खरीप हंगाम, रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगामाच्या पाळीसाठी सध्या ज्या पद्धतीने पाणी मिळाले आहे. त्याच पद्धतीने पाण्याची तरतूद करावी अशी ही मागणी उपस्थित शेतकरी बांधवांतून व्यक्त करण्यात आली. दरम्यान या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या आमदार समाधान आवताडे साहेबापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू,असे आश्वासनही मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिले.
यावेळी सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच जगन्नाथ जाधव ग्रा.प.स.बाळासाहेब जाधव,तानाजी रणदिवे, उमेश भोसले,द्रोणाचार्य हाके मेंबर,कल्याण कुसुंमडे, मोहन आप्पा बागल, सुधाकर जाधव पाटील, शांतिनाथ बागल, सुधाकर नाना फाटे, राजेंद्र हुंडेकरी, दत्ता आबा पाटील, शरीफ भाई शेख, दत्तात्रय कोळेकर, भास्कर घायाळ, प्रथमेश बागल, सुनील रणदिवे, विठ्ठल पाटील, बाळासाहेब जाधव, सोमनाथ कुसुमडे, पंजाब पवार, दत्ता जाधव, नाथ जाधव, राजेंद्र जाधव, कुबेर हजारे, बाळासो मोरे, पांडुरंग मोरे, अनिल मोरे, पुण्यवंत जाधव, नवनाथ शिंदे, बंडू हजारे, सुनील जाधव, राजेंद्र जाधव, तुकाराम हजारे,अंकुश हजारे,गुरुनाथ मोरे, शिवाजी शंकर जाधव आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनीधी : नवनाथ खिलारे