पुणे, २ ऑगस्ट २०२० : प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ” पथविक्रेत्यांसाठी सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजना कर्ज योजना पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्दीतील विक्री व्यवसाय करणा-या फेरीवाले पथविक्रेते लघु व्यावसायिक यांनी लाभ घ्यावा . नागरी पथविक्रेते यांना १ वर्षाच्या परत फेड मुदतीसह रक्कम रूपये १०,०००, पर्यंतचे बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात यावी अशी जिल्हाधिकारी यांना मागणी करण्यात आली याबाबत संपूर्ण जिल्ह्यातील लोकांना जागृती सोशल मिडिया व झूम ऍप व ऑनलाईन मिटिंग घेऊन करण्यात आली.
याबाबत दि २९ तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालय पुणे नगरपालिका प्रशासन शाखा यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या मुख्याअधिकारी कार्यालयाला योजने बाबत कारवाई करून उत्तर देण्याचा आदेश केला आहे. ही योजना अजून सोपी कशी करून घेता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे शेख यांनी सांगितले ही योजना जास्तीत जास्त छोट्या व्यावसायिकांनी मिळवून देण्याचा प्रयत्न AIMIM पक्षा मार्फत जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन करण्यात आले पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना याबाबतचे आदेश ईमेलद्वारे देण्यात आले आहेत. जर हि योजना जिल्ह्यात कोणती नगर पालिका राबवत नसेलतर त्या नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर कायद्या नुसार करणार आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सर्व पथविक्रेत्यांना कळविणेत येते की , केंद्र शासन पुरस्कृत ” प्रधान मंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ” पथविक्रेत्यांसाठी सूक्ष्म – पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी करण्यास शासन निर्णय क्रं . पीएमस्वनिधी- २०२० / प्र . क्र . ७७ / नवि -२० , दि . १७ जून २०२० अन्वये सुचित केलेले आहे .
तरी आपल्या शहरामधील विक्री / व्यवसाय करणा – या फेरीवाले / पथविक्रेते / लघु व्यावसायिक यांनी लाभ घ्यावा . लाभाचा तपशिल : नागरी पथविक्रेते यांना १ वर्षाच्या परत फेड मुदतीसह रक्कम रूपये १०,००० / – पर्यंतचे बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून दिले जाईल . सदर कर्जावर आर . बी . आय . च्या प्रचलित दराप्रमाणे व्याज दर लागू राहिल.तसेच त्याचे दरमहा हप्त्याने परतफेड केल्यास ७ % वरील व्याज अनुदानाचा लाभ दिला जाईल .
नियमित डिजिटल व्यवहार केल्यास कॅश – बॅक साठी पात्र , पात्र लाभार्थी नगरपरिषदेने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणात आढळलेले परंतू त्यांना विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते ५. दि .२४ मार्च , २०२० रोजी व त्यापूर्वीचे शहरामध्ये विक्री / व्यवसाय करणारे पथविक्रेते . टाळेबंदी ( Lockdown ) नंतर व्यवसाय करणारे पथविक्रेते आवश्यक कागदपत्रे : ६. आधारकार्ड व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर ७. मतदान ओळखपत्र ८. वाहन परवाना ९ . रेशनकार्ड १०.बँक पासबुक झेरॉक्स ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करणार असल्याचे फैय्याज शेख अध्यक्ष पुणे जिल्हा ,ऐ आय एम आय एम,ऑल इंडिया मजलिस-ऐ-इत्तेहादुल मुस्लिमीन
न्यूज अनकट प्रतिनिधी