श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन भाविकांना घरबसल्या पाहता येणार

पुणे, 19 सप्टेंबर 2021: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने भाविकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.
कोरोनाचे संकट पाहता ट्रस्ट ने यंदा भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. गर्दी टाळण्यासाठी केलेल्या या उपक्रमाची दखल पंतप्रधान मोदी यांनी देखील घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रीं च्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केलं आहे. दगडूशेठच्या गणपतीचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार असून ऑनलाईन पद्धतीने भाविकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे.
रविवारी संध्याकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळाच्या कुंडामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे.
गणपतीचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था दगडूशेठ गणपती ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा