शिरूर मधील आठवडे बाजार बंद, तहसीलदार लैला शेख यांची माहिती..!

शिरूर २६ ऑगस्ट २०२०: शिरूर तालुक्यातील वाढता कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षात घेता शिरूर तालुक्यातील काही गावात आज पासून आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

त्याशिवाय रस्त्यावरील भाजी विक्री, बंद चहा, व खाद्यपदार्थांचे गाड्या हॉटेल यांना फक्त घरपोच पार्सल सेवा देता येईल असे नवीन आदेश आजपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून उल्लंघन करणाऱ्यांचे आस्थापना बंद करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगाव, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, सणसवाडी, तरडेबाचीवाडी, तळेगाव ढमढेरे, धानोरी, डिग्रजवाडी, कोरेगाव-भीमा, शिरूर ग्रामीण, व शिरूर नगरपालिका येथील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे या सर्व गावांमध्ये पुढील आदेश येईपर्यंत खालील प्रतिबंध लागू केले आहेत.

दुकाने व्यापारी आस्थापना बँक यांनी नियमभंग केल्यास रुपये पाचशे रुपये दंड व दुसऱ्या वेळेस नियमभंग १००० रुपये व तिसऱ्या वेळेस नियम भंग केल्यास १८८ अंतर्गत फौजदारी कारवाई करून आस्थापना दुकाने बंद करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, यांनी दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा