‘स्वर प्रथम’च्या ‘वेलकम २३’ संगीत मैफिलीस औरंगाबादकर रसिकांचा उदंड प्रतिसाद

औरंगाबाद, ६ जानेवारी २०२३ : रसिकांनी खचाखच भरलेले नाट्यगृह, प्रत्येक गाण्यागणिक वन्समोअर, शिट्या आणि टाळ्यांची बरसात, आबालवृद्धांच्या अफलातून प्रतिसादात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी (ता. एक जानेवारी २०२३) सायंकाळी आयोजित ‘स्वर प्रथम’ प्रस्तुत ‘वेलकम २३’ मराठी-हिंदी गीतांची मैफील गायक, वादकांच्या बहारदार सादरीकरणामुळे औरंगाबादकरांच्या कायम स्मरणात राहील अशी झाली.

तत्पूर्वी संगीत मैफिलीचे दीपप्रज्वलन औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजलीताई धानोरकर,
प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध संगीतकार व गायक श्री. अतुल दिवे, गायिका वैशालीताई कुर्तडीकर, गिटार वादक श्री. श्रीराज कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाले.

याच मैफीलमध्ये गिटार वादक श्रीराज कुलकर्णी आणि गुरुजी श्री. अतुल दिवे यांचा मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.

गायक दीपक पवार यांनी गायिलेल्या विविध गीतांतून रसीकही अक्षरशः डोलायला लाडले. ‘कजरा मोहोबत वाला’ या श्रुती कुलकर्णी आणि नंदिनी महाजन यांनी, तर
‘कुछ ना कहो…’ या प्रथमेश महाजन यांनी गायिलेल्या
गीताला वन्समोअर मिळाला.

श्री. सुहास महाजन यांच्या निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली त श्री. नाना पाटेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन ‘वजुद’मधील ‘कैसे बताऊ मै तुम्हे…’ हा संवाद देखील त्यांनी सादर केला.

कु. आकांक्षा पिंपळे हिने ‘वेलकम २३’ची सुरेख रांगोळी रेखाटली. ऋषिकेश धर्माधिकारी यांनी ध्वनिव्यवस्था, तर
सौरव सावळे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी चोख पार पाडली.

यावेळी प्रसाद साडेकर, गजानन केचे, सुभाष पळसकर, श्रीपाद पदे, वैभव पांडे, वर्षा जोशी, कृष्णा कुलकर्णी, ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, धनंजय बोटवे, सचिन कुलकर्णी, सुशांत बडे, शैलजा मुन्शी, उमेश जोशी, डॉ. आरती शामल जोशी, डॉ. प्रफुल्ल पिंपळे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अमोघ केऱ्हाळकर, हर्षवर्धन हेलवाडे, खुशी, मंजिरी, प्रणव कुलकर्णी, समर्थ जोशी,
आदींनी परिश्रम घेतले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा