गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचे बारामती तालुक्यात गुढी उभारून स्वागत

गोपीचंद पडळकर यांच्या आमदारकीचे बारामती तालुक्यात गुढी उभारून स्वागत

बारामती, दि.१९ मे २०२०: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने  विधान परिषदेवर संधी दिली. त्यांच्या बिनविरोध निवडीनंतर पळशी, मासाळवाडी भागात गुढी उभारुन आनंद व्यक्त करण्यात आला.

पुढील काळात पडळकर हे महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोकांचे प्रश्न विधान परीषदेत आक्रमकपणे मांडतील. तसेच त्या पदाला न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. बारामती तालुका भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष निलराजे मासाळ यांनी बोलताना हे मत व्यक्त केली.

पडळकर यांना मिळालेल्या या आमदारकीचे तालुक्यातील त्यांच्या समर्थकांनी पळशी, मासाळवाडीसह विविध भागात  गुढी उभारून स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बारामती तालुका भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दादासाहेब करे, बाळासाहेब मासाळ, सुभाष मासाळ, विजय ठोंबरे, दिपक मासाळ, सोनबा गोफणे, मल्हारी धायगुडे, आप्पा ठोंबरे, अनिल ठोंबरे, पोपट ठोंबरे, अमोल ठोंबरे आदी उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

error: Content is protected !!
Exit mobile version