संत तुकोबांच्या पादुकांचे इंदापुरात साध्या पध्दतीने स्वागत

इंदापूर, दि. ३० जून २०२०: सध्या कोरोनाचे थैमान असल्यामुळे सर्व सण उत्सव पालखी सोहळे प्रशासनाने रद्द केले आहेत. परंतु पारंपरिक असणारा पालखी सोहळा यामध्ये खंड पडू नये म्हणून पालखी प्रमुखांनी प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार आज दुपारी एक वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीत संत तुकोबारायांच्या पादुका पंढरपूर कडे मार्गस्थ झाल्या.

सायंकाळी सहाच्या सुमारास संत तुकोबांच्या पादुकांचे इंदापुर मध्ये आगमन झाले. फुलांनी सजवलेल्या लालपरी मध्ये पालखी सोहळा प्रमुख विशाल मोरे संतोष मोरे आणि २० वारकरी यांसह चाललेला विठोबाचा गजर, टाळ आणि मृदुंग आणि पोलिसांचा फौजफाट्यासह इंदापूर शहरातील कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणात थोडावेळ विसावला. परंतु यंदा मात्र परंपरागत होणारा रिंगण सोहळा फुगडी आणि भजन-कीर्तन यांना मात्र इंदापूरकर तसेच अनेक शहरवासीयांनी दुरूनच संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.

इंदापूर नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी तुकोबांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा